breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्पर्धा परीक्षा देऊन दमला, अखेर बेरोजगारीला कंटाळून बुलढाण्यातील तरुणाची गळफास लावून आत्महत्या

बुलढाणा – चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर या गावातील २४ वर्षीय तरुणाने बेरोजगारीला कंटाळून स्वतःच्या शेतातील गोठ्यात गळफास घेवून आत्महत्या केली.

चिखली तालुक्यातील रहिवाशी असलेले समाधान गोविंदराव माळेकर यांना एक मुलगी व एक मुलगा असे दोन अपत्य असून दोन्ही मुलांना त्यांनी चांगले शिक्षण दिले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून एकुलता एक मुलगा असलेला २४ वर्षीय योगेश समाधान माळेकर हा नोकरीसाठी साखरखेर्डा, व चिखली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करून ठिकठिकाणी नोकरी साठी प्रयत्न करीत होता.मात्र त्याला कुठेही यश मिळत नसल्याने तसेच बहिणीचे लग्न बाकी असल्याने नैराश्य आले होते.आई- वडिल शिक्षणासाठी किती दिवस आपल्यावर पैसे खर्च करतील याचे मनात टेन्शन घेवून त्याने त्याच्या शेतातील गुरांच्या गोठ्यातच नॉयलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.

बराच वेळ होवूनही योगेश जेवणासाठी घरी आला नाही. त्यामुळे आई वडील बहीण यांनी गावात मित्राकडे तसेच आजूबाजूला शोधाशोध केली. परंतु तो कुठेही दिसून आला नाही. शेत गावालगत असल्याने त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता मुलाने गोठ्यात गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याच्या आई वडिलांनी पोलिसात बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button