breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान

मुंबई | महाईन्यूज

हिंदी चित्रपट श्रष्टीतील सुप्रसिध्द महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाला त्यांची पत्नी खासदार जया बच्चन आणि मुलगा अभिषेकही उपस्थित होता.

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी नसल्यानं ते उपस्थित राहू शकले नाही.

हा पुरस्कार आज (२९ डिसेंबर) प्रदान करणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं. रविवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आलं.

पुरस्कार जाहीर होताच मनात शंका आली – बच्चन

दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी मला पात्र समजलं. त्याबद्दल सरकार, माहिती प्रसारण मंत्रालय आणि निवड समितीचे आभार व्यक्त करतो. अतिशय नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारत आहे. ज्यावेळी पुरस्काराची घोषणा झाली. त्यावेळी माझ्या मनात एक शंका आली की, हा पुरस्कार कशाचे संकेत आहे. भरपूर काम केलं, आता घरी बसा असा संदेश द्यायचा आहे का ? अशी शंका माझ्या मनात आली. पण, मला अजून भरपूर काम करायचं आहे, असं अमिताभ बच्चन यांनी पुरस्काराला संबोधीत करताना सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button