breaking-newsताज्या घडामोडी

तुकाराम मुंढे यांना स्मार्ट सिटी प्रकल्प सीईओ पदावरुन हटवण्यात आलं

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना स्मार्ट सिटी प्रकल्प सीईओ पदावरुन हटवण्यात आलं आहे. मुंढे यांच्या ऐवजी आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोने यांची स्मार्ट सिटी संचालक पदावर निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, स्मार्टी सिटी समन्वयक म्हणून मुंढे कामकाज पाहणार आहेत. नागपूर येथील संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजेच स्मार्ट सीटीचे अध्यक्ष प्रविण परदेसी यांनीच फोनद्वारे आपणास सीईओ म्हणून नियुक्त केल्याचा दावा मुंढे यांनी या वेळी केला.

गेल्या काही काळापासून नागपूर महापालिका नगरसेवक आणि सर्वपक्षीय नगरसेवक आणि आयुक्त मुंढे यांच्यात टोकाचा संघर्ष सुरु होता. त्यामुळे मुंढे यांच्या विरोधात कुरुबुरु सुरु होत्या. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकपदी मुंढे यांची नियुक्ती होणे आणि सर्व सहमतीने मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करणे याबाबत एक बैठक बोलावण्यात आली होती. तब्बल पाच महिन्यांनी झालेल्या या बैठकीस प्रवीण परदेसी सुद्धा उपस्थित होते.

या बैठकी आगोदर महापौर संदीप जोशी आणि सत्ता पक्षनेता संदीप जाधव यांनी संचालक मंडळाच्या इतर संचालकांना एक पत्र पाठवले होते. या पत्रात ‘कायद्याच्या अधीन राहून निर्णय घ्यावा’, असे आवाहन केले होते. दुसऱ्या बाजूला आयुक्त मुंढे यांनीही त्यांच्या खास अधिकाऱ्यांची बैठक घेत तयारी केली होती असही समजतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button