breaking-newsताज्या घडामोडीव्यापार

सोने आणि चांदीत नफावसुली; सोन्याच्या दरात पुन्हा घसरण

जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि कोरोना संकटावर बड्या अर्थव्यवस्थांचे आर्थिक पॅकेज यामुळे कमॉडिटी बाजार अस्थिर बनला आहे. मागील काही सत्रात उच्चांकी स्तरावर गेलेल्या सोने आणि चांदीत नफावसुली होताना दिसत आहे. आज गुरुवारी सोन्याच्या दरात ६८४ रुपयांची घसरण झाली असून तो ५१९३८ रुपये झाला आहे.

सकाळी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने दरात १६०० रुपयांची उलथापालथ दिसून आली. इंट्रा डेमध्ये सोने ५१८६५ रुपयांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरले. तर ५२५५० रुपयांचा स्तर गाठला होता. चांदीच्या दरात देखील ९८३ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या चांदीचा भाव एक किलोला ६६९८० रुपये आहे.


रशियाने करोनाप्रतिबंधात्मक लशीचे उत्पादन जोरात सुरु केले आहे. तर इतर देशांचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आर्थिक संकटाच्या निमित्ताने तेजीत आलेले सोने आणि चांदीच्या वाढीला ब्रेक लागला आहे. रशियात करोना लस तयार झाल्याने या महामारीवर नियंत्रण मिळवण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे जागतिक कमॉडिटी बाजारातदेखील सोन्याचा दरात मोठी घसरण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button