breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोना परिस्थितीत शाळांकडून विद्यार्थ्यांना शूल्क भरण्यास तगादा नको

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे प्रवेश रोखू नका व फीसाठी त्यांना व त्यांच्या पालकांना तगादा लावू नये, अशी मागणी पिंपरी युवासेना व मैत्रीग्रुपच्या वतीने दापोडी-फुगेवाडीतील शाळा व्यवस्थापनाला करण्यात आली.

देशात कोरोना सारख्या रोगाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा कामधंदा, व्यवसाय डबघाईला आला आहे. तरी, आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व त्यांच्या पालकांना फीसाठी तगदा लावू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, मैत्री ग्रुपचे रवी कांबळे, दीपक साळवे, मेहबूब शेख, मोईन मुजावर, अतुल कांबळे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button