breaking-newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजन

‘तान्हाजी’ चित्रपट 15व्या दिवशीही हाऊसफुल…चित्रपटगृहाच्या गेटबाहेर तिकीटासाठी प्रेक्षकांची रांग…

पुणे | महाईन्यूज |

अभिनेता अजय देवगणचा ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट १० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जादू केली होती. आता चित्रपटाने २०० कोटींचा पल्ला पार करत नवा विक्रम केला आहे. 15 व्या दिवशीही हा चित्रपट हाऊसफुल आहे.याचं उदाहरण म्हणजे तानाजी चित्रपटाचं तिकीट काढण्यासाठी एका चित्रपटगृहाच्या गेटच्या बाहेर पर्यंत प्रेक्षकांची रांग पहायला मिळाली. आणि कमालीची गोष्ट म्हणजे या रांगेतील प्रेक्षकांना आम्ही विचारलं असता सर्वच रांग ही तनाजी या चित्रपटासाठीच होती…

एवढच नाही तर एका फॅन ने त्यांच्या ग्रुपने काढलेले फॅनचे तिकीटस् त्यांच्या कारच्या मागच्या काचेवर लावले होते…तानाजी चित्रपट रिलीज झाल्यापासून ते आतापर्यंत या चित्रपटाचं क्रेझ काही कमी झालेलं दिसत नाही…

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने तान्हाजी चित्रपटाची कमाई ट्विटरद्वारे सांगितली आहे. प्रदर्शनाच्या १४ दिवसांमध्ये चित्रपटाने १९२ कोटी २८ लाख रुपयांची विक्रमी कमाई केली होती. यातील ७८ कोटी १६ लाख रुपये या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात कमावले. आता १५व्या दिवशी चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमावला आहे.

‘तान्हाजी’ हा यंदाच्या वर्षातील २०० कोटी कमावणारा पहिला चित्रपट आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button