breaking-newsमनोरंजनमुंबई

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर

मुंबई | ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सुरेश वाडकर यांनी खूप आनंद व्यक्त केला आहे. भारत सरकारकडून ऐवढा मोठा सन्मान मिळणे हे माझे मोठे भाग्य असल्याची प्रतिक्रिया सुरेश वाडकर यांनी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील मानाचे नागरी सन्मान असलेल्या पद्म पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली.

सुरेश वाडकर यांनी सांगितले की, गृहमंत्रालयाकडून फोनवरुन मला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती देण्यात आली. ज्येष्ठ गायिका लतादीदी आणि आशादीदींच्या आशीर्वादामुळे मला हा पुरस्कार मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लता मंगेशकर राष्ट्रपतींना पत्र पाठवत होत्या की सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार द्या. त्यांना खूप खंत आणि काळजी होती. मला पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचे एकून त्यांना देखील आनंद होईल, असे वाडकरांनी सांगितले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button