breaking-newsपिंपरी / चिंचवड

तानाजीनगरमध्ये ड्रेनेजलाईन फु टली; पवनेत मैलामिश्रित पाणी

नागरिकांमध्ये चिंता : महापालिका प्रशासनाने कार्यवाही करण्याची मागणी

पिंपरी । महाईन्यूज  । प्रतिनिधी

चिंचवड- तानाजीनगर येथील ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे मैलामिश्रित पाणी थेट पवना नदीत जात आहे. अगोदरच नदीत असलेल्या जलपर्णी या मैलामिश्रित पाण्यामुळे अधिकच वाढत आहे. तोंडावर असलेला पावसाळा आणि त्यामुळे पसरणारी रोगराई विचारात घेता या परिसरातील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत.

दरम्यान, तानाजीनगर येथील फुटलेल्या ड्रेनेज लाईनचे हजारो लिटर मैलामिश्रित पाणी नदी पात्रात जात आहे. मैलामिश्रित पाणी जलपर्णी वाढीसाठी पोषक असल्यामुळे नदीत अगोदरच असलेली जलपर्णी अधिकच वाढत आहे.

शहरात कोरोना महामारी आणि येणारा पावसाळा पाहता रोगराई पसरण्याची भीती परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत. काकडे पार्क ते लक्ष्मीनगर परिसरात जलपर्णी अधिकच वाढली असून महानगरपालिकेने जलपर्णी काढण्यासाठी ठेकेदार नेमला आहे. मात्र, पालिका अधिकारी व संबंधित ठेकेदार याबाबत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button