breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या ११ पाकिस्तानी बोटी ‘बीएसएफ’ने पकडल्या!

गुजरात |

गुजरातच्या कच्छ जिल्ह्याजवळील भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर असलेल्या हरामी नाला खाडी परिसरात काल (९ फेब्रुवारी) पाकिस्तानी मच्छिमार बोटी आणि मच्छिमारांची घुसखोरी आढळून आली होती. यानंतर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) रात्रभर शोधमोहीम राबवून आतापर्यंत ११ पाकिस्तानी बोटी जप्त केल्या आहेत. तर कारवाई अद्यापही सुरूच आहे. या नौका जप्तीनंतर, बीएसएफने आखाती प्रदेशात शोध मोहीम सुरू केली आहे. शेजारील देशातून अशा आणखी काही बोटी भारतीय हद्दीत घुसल्या आहेत का? याचा शोध घेतला जात आहे.

बीएसएफचे गुजरात फ्रंटियर इंस्पेक्टर जनरल जीएस मलिक यांनी सांगितले की, “नियमित गस्ती दरम्यान, बीएसएफच्या जवानांनी परिसराचे संपूर्ण पाहणी करण्यासाठी आकाशात ड्रोन सोडले होते. दरम्यान यूएव्हीच्या माध्यमातून हरामी नाला परिसरात नऊ मासेमारी नौका आढळून आल्या. त्यानंतर बीएसएफच्या गस्ती नौका तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी पाकिस्तानी मच्छिमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या.तसेच त्यांनी सांगितले की, आतापर्यंत एकही पाकिस्तानी मच्छीमार पकडला गेला नाही. कारण बीएसएफ कडून कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच या बोटीवरील लोक पाकिस्तानच्या दिशेने  पळून गेले असावेत.बोटी सापडल्यानंतर आम्ही खाडी परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. कारण आम्हाला वाटते की आणखी काही बोटी असू शकतात. भारतीय हद्दीत घुसखोरी करणारे पाकिस्तानी मच्छिमार आम्हाला सापडण्याची शक्यता आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button