breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेत आणखी एक आजार,६४० जणांना ‘सायक्लोस्पोरा’ची लागण

न्यूयॉर्क – जगभरातील शेकडो देशांमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगातील असंख्य वैज्ञानिक दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका बलाढ्य महासत्ता असलेल्या अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 48 हजाराहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र इतकी गंभीर परिस्थिती असताना अमेरिकेला आता आणखी एका आजाराने ग्रासले आहे. ‘सायक्लोस्पोरा’ नावाचा आजार अमेरिकेत वेगाने पसरत असून आतापर्यंत येथील 11 राज्यांमधील 640हून अधिक लोकांना हा आजार झाला आहे.

सूक्ष्म परजीवींशी संबंधित सायक्लोस्पोरियासिस रोगाची भूक न लागणे, पोट फुगणे, मळमळ, सौम्य ताप, थकवा आणि अतिसार अशी लक्षणे आहेत. ही लक्षणे साधारणत: पॅकेटमधील अन्न किंवा पाणी प्यायल्यानंतर एका आठवड्यांनी दिसतात. मिळाल्याने माहितीनुसार, सायक्सोस्पोरा हा आजार पॅकेटमध्ये विकल्या जाणाऱ्या सॅलडमुळे होतो असे म्हटले जात आहे. पॅकेट सॅलडमध्ये आइसबर्ग लेटस, गोभी आणि गाजर असतात. हे सॅलड खाल्यानंतर तब्बल 641 जणांना या विचित्र आजाराची लागण झाली आहे. यातील 37 जणांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button