breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मुंबई : शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदेंचं नाराजीनाट्य, काँग्रेस सतर्क, आमदारांना महत्त्वाचे आदेश

मुंबई : शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे हे २० आमदारांसह सुरतला गेल्यानं राज्यातील राजकारणात राजकीय भूकंप झाला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या सुरतला जाण्यामुळं निर्माण झालेली राजकीय स्थिती आणि विधानपरिषद निवडणुकीत स्वीकारावा लागलेला पराभव या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक पार पडली. काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभव स्वीकारावा लागला. तर, दुसरीकडे भाई जगताप हे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार असून देखील ते विजयी झाले. विधानपरिषद निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक पार पडली. महाविकास आघाडी म्हणून आमचे तीन पक्ष आणि मित्र पक्ष एकत्रितपणे काम करत आहोत. जी नवीन स्थिती निर्माण झालीय त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही चर्चा केली आहे. आवश्यकता वाटल्यास आम्ही एकत्रित बैठक करु, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. कोणत्याही प्रस्तावाबद्दल आम्हाला माहिती नाही. उद्धव ठाकरेंना आम्ही सोबत आहोत अशी माहिती दिली आहे. सध्याच्या स्थितीत वक्तव्य करणं बरोबर नाही. जे तुम्हाला माहिती आहे तिच माहिती आमच्याकडे आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. काँग्रेसचे प्रभारी कमलनाथ आवश्यकता असल्यास महाराष्ट्रात येतील. महाविकास आघाडी सरकार संकटात आहे, असं वाटत नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
  • राज्यातही घडामोडी वाढल्या
शिवसेना नेते एकनाथ शिंदे सुरतमध्ये आमदारांना घेऊन गेल्यानंतर राज्यात घडामोडी वाढल्या आहेत. विश्वजित कदम हे काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेऊन पुन्हा काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहिले. तर, मंत्रालयात अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हे देखील उपस्थित असल्याची माहिती आहे.
  • काँग्रेस आमदारांना मुंबईत थांबण्याच्या सूचना
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या आमदारांना मुंबईत थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईचे काही आमदार विधानपरिषदेच्या निवडणुकीनिम्मित मुंबईत होते. तर, अनेक आमदार मतदारसंघात गेले होते त्या आमदारांना मुंबईत परत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काँग्रेसची आज दुपारी पुन्हा एकदा बैठक होणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button