breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

ढिगा-याखाली सापडून कामगाराचा मृत्यू; एकजण गंभीर

ड्रेनेज लाईनचे काम करताना जेसीबीच्या साहाय्याने ड्रेनेज लाईन मधील माती बाजूला काढण्यात आली. दोन कामगार आतमध्ये काम करत असताना अचानक आलेल्या पावसामध्ये मातीचा ढिगारा ड्रेनेज लाईनमध्ये पडला. त्या मातीच्या ढिगाऱ्या खाली अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला. तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.

मनोज कुमार असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर बाळू नामदेव भिंगारदिवे (वय 5०) असे जखमी कामगाराचे नाव आहे. जखमीला नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, च-होली येथे ड्रेनेज लाईनचे काम सुरु आहे. जेसीबीच्या साहाय्याने ड्रेनेज लाईन मधून माती बाहेर काढण्यात आली आहे. मातीचा मोठा ढिगारा बाजूला लावण्यात आला आहे. ड्रेनेज लाईनमध्ये उतरून दोन कामगार काम करीत होते. दुपारी अचानक पाऊस आला आणि ड्रेनेज लाईनच्या बाजूला टाकलेल्या ढिगा-यावरील माती ड्रेनेज लाईनमध्ये पडली. मातीच्या ढिगाऱ्या खाली दोघे अडकले.  त्यात मनोज या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत काम करीत असलेला कामगार जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचे नाव समजू शकले नाही. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

mati 2

mati 3
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button