breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

मुंबईतील एका हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापेमारी, मुनव्वर फारुकीला घेतलं ताब्यात

Munawar Faruqui | मुंबईतील एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापेमारी केली. या छापेमारीत बिग बॉस १४चा विजेता मुनव्वर फारुकीसह १४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला सोडून दिलं.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर्ट परिसरातील हुक्का पार्लरवर छापा टाकल्यावर ‘बिग बॉस १७’ चा विजेता मुनव्वर फारुकी व इतर १३ जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या सर्वांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे हुक्का पार्लर बेकायदेशीरपणे चालवले जात होते. छापेमारीत ४,४०० रुपये रोख आणि १३,५०० रुपये किमतीचं सामान जप्त करण्यात आलं आहे. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनं कायद्याच्या कलमांतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा    –      प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगेसोबत नवी आघाडी! उमेदवारांची नावे जाहीर 

दरम्यान, ताब्यात घेतल्याची बातमी आल्यानंतर मुनव्वर फारुकीने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आहे. थकलोय तरी प्रवास करतोय, असं त्याने स्टोरीमध्ये मुंबई विमानतळावरून फोटो शेअर करत लिहिलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button