breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” उत्साहात

पिंपरी / महाईन्यूज

प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमजुंषा स्पर्धेत 300 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन राम काडंगे (पश्चिम विभागीय अध्यक्ष), माजी विद्यार्थी सूर्यकांत सरवदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले.

२७ जानेवारी रोजी “विठ्ठल तो आला आला” या एकांतिकेचे ऑनलाईन वाचन केले. यात विभागातील अक्षय होळकर, चद्रकांत सोनवणे, आकाश टेभुर्णीकर, तेजस राजिवडे, हर्षद जानराव , गोविंद गायकवाड,  अविनाश पांडे, सचिन शेळके, परमेश्वर रिटे, अरूणा साबळे, रेणुका मिठे, कोमल जावीर या विद्यार्थ्यांनी अभिवाचन केले.

२८ जानेवारी रोजी प्रा. वैशाली ढोले यांनी “मराठी म्हणीतील मानसशास्त्र “या विषयावर मार्गदर्शन केले मराठी माणसाच्या मनात अनेक म्हणी दडलेल्या असतात त्यातून उजाळा देण्याचे मानसशास्त्र करत असतो. तोच आज एक लेखक बनला आहे. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक डॉ. अतुल चौरे यांनी केले. स्वागत व परिचय डॉ. संजय नगरकर यांनी केले. आभार प्रा. तानाजी हातेकर यांनी मानले.

२९ जानेवारी रोजी मराठी भाषा आणि भाषिक कौशल्य विकास या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी डॉ. शिरीष लांडगे (बीजभाषक), डॉ. हरेष शेळके, डॉ. राहुल पाटील यामान्यवरांनी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाठी प्राचार्य डॉ. अरूण आंधळे, डॉ. रमेश रणदिवे, डॉ. राजेंद्र रासकर, प्रा. सुशीलकुमार गुजर, प्रा. भिमराव पाटील, प्रा. नलिनी पाचार्णे हे ऑनलाईन उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजक मराठी विभागप्रमुख डॉ. संजय नगरकर, डॉ. अतुल चौरे, प्रा. मिनाक्षी कापरे यांनी केले. विद्यार्थीवर्ग मोठ्यासंख्येने ऑनलाईन उपस्थित होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button