breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत पहिल्यांदाच कालिपुत्र कालीचरण महाराज यांचे “शिवतांडव स्तोत्र पठण” व मार्गदर्शन

दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत अभिजीत लालचंद लांडगे यांचा अभिष्टचिंतन सोहळा

पिंपरी : सर्व वारकरी संप्रदाय, बंधू भगिनी यांच्यासाठी अभिजीत लालचंद लांडगे यांच्या अभिष्टचिंतना निमित्ताने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या १८ जानेवारीपासून ते २५ जानेवारीपर्यंत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रोज सायंकाळी ६ ते ९ “श्रीमद भागवत कथा” ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. काली पुत्र कालीचरण महाराज, अवधुत गांधी, हिंदुराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई, यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमात भोसरी या ठिकाणी होणार आहेत. 

येत्या २४ जानेवारीला सायं ५:३० वा भक्ती-शक्ती संगम संतवाणी व शौर्याची गाणी सादरकर्ते आणि फत्तेशिकस्त, पावनखिंड व शेर शिवराज या लोकप्रिय चित्रपटांतील गाजलेल्या गीतांचे गायक अवधुत गांधी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या गीतांची मेजवाणी श्रोत्यांना यावेळी घेता येणार आहे. हिंदुराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई, यांचे मार्गदर्शन कार्यक्रम  सायंकाळी ६ ला तर सोशल मीडियावरसोबतच देशाच्या कानाकोपऱ्यात ज्यांचा नावलौकीक झाला आहे. अशा कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या चैतन्यमय वाणीतून २४ जानेवारीलाच सायं ६.३० वा  “शिवतांडव स्तोत्र पठण”  होणार आहे. भोसरीत पहिल्यांदाच कालीपुत्र कालीचरण महाराज यांचे आगमन होत आहे. त्यामुळे लोकांची गर्दी होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दि १८ जानेवारी २०२३ रोजी दुपारी ३ वाजता श्रीमद भागवत कथा ग्रंथ दिंडी मिरवणुक पि.म.टी चौक ते बापुजी बुवा चौक अशी होईल व सायं ६ वा कथा शुभारंभ सर्वदर्शनाचार्य ह.भ.प गुरुवर्य माणिक शास्त्री मुकेकर बाबा यांच्या शुभहस्ते भागवत कथा सांगता समारंभ २४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता शांतिब्राह्म ह.भ.प गुरुवर्य मारोती कुरेकर बाबा यांच्या शुभहस्ते होईल. त्याचसोबत दररोज सांयकाळी ५ ते ६ यादरम्यान हरिपाठ देखील होणार आहे. तसेच काल्याचे कीर्तन २५ जानेवारी २०२३ सकाळी ९ ते ११ करण्याचे योजिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button