breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. पद्माकर पंडीत यांच्या नियुक्तीवरून सर्वसाधारण सभेत होणार राडा

  • स्थायी समिती बैठकीत नगरसेवकांनी घेतला आक्षेप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या विभागप्रमुख पदावरून अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांची उलचबांगडी करून डॉ. पद्माकर पंडीत यांची नेमणूक करण्यात आली. त्यावरून मानधनावर नियुक्त डॉ. पंडीत वायसीएमचे प्रमुख कसे काय, असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात आला. तसेच, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी परस्पर ही नेमणूक केल्यामुळे गुरुवारी (दि. 20) सर्वसाधारण सभेतही यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभाग व रुग्णसेवेचा डॉ. रॉय व डॉ. साळवे यांच्यातील वादामुळे खेळखंडोबा झाला आहे. त्यांच्यातील वादामुळे दोघांमध्ये कारभाराची विभागणी करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वीच आयुक्त हर्डीकर यांनी डॉ. रॉय यांच्याकडून वायसीएमच्या विभागप्रमुखाचा पदभार काढून तो डॉ. साळवे यांच्याकडे देण्यात आला होता. आयुक्तांनी पुन्हा हा पदभार पदव्युत्तर महाविद्यालयासाठी नेमलेले प्राध्यापक तथा विशेष कार्य अधिकारी डॉ. पंडीत यांच्याकडे सोपविला आहे. मात्र, आयुक्तांनी परस्पर घेतलेल्या या निर्णयावरून नाराजी व्यक्त होत आहे.

डॉ. पंडीत हे शासन सेवेत होते. परंतु, त्यांची वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालयासाठी मानधनावर ठराविक कालावधीसाठी नेमणूक केली होती. तरी देखील महापालिकेच्या अधिका-यांना बाजुला सारून डॉ. पंडीत यांना विभागप्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. हे योग्य नसल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर आयुक्त हर्डीकर वैद्यकीय महाविद्यालायाचा अधिष्ठाता म्हणून डॉ. पंडीत यांना नेमले जाणार असल्याने त्यांच्याकडेच वायसीएमचा कारभार देत असल्याचा खुलासा केला.

दरम्यान, आयुक्तांच्या या खुलाशावर नगरसेवकांचे समाधान झालेले नाही. तसेच, महापालिका सभेत देखील उद्या या नियुक्तीवरून राडा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महापालिकेतील अधिका-यांकडूनही आयुक्तांच्या या निर्णयाविरुध्द राजकीय पातळीवरून वातावरण तापविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button