breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

पेट्रोल, डिझेल सलग पाचव्या दिवशी महागले

नवी दिल्ली – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक कंपन्यांना टाळे लागले. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले, तर अनेकजणांना अर्ध्या पगारावरच समाधान मानावे लागत आहे. त्यातच कोरोना काळात वाढत्या महागाईचा फटकाही सर्वसामान्यांना बसत आहे. सरकारी पेट्रोलिअम कंपन्यांनी आज पेट्रोलचे दर 6 पैशांनी वाढविले असून डिझेल 16 पैशांनी महागले आहे. परिणामी मुंबईत आज पेट्रोल 88.29 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 77.90 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

कोरोना काळात 15 वर्षांपेक्षा कमी किंमतीवर गेलेले कच्च्या तेलाचे दर आता कोरोना लस येण्याची चाहूल लागताच कमालीचे वाढू लागले आहेत. 2021मध्ये ओपेक देशांचे लक्ष्य काय असेल हे ठरविण्यासाठी 30 नोव्हेंबर, 1 डिसेंबरला बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर 40 वरून 45 डॉलरवर पोहोचले आहेत. याचाच परिणाम गेल्या आठवडाभरापासून पहायला मिळाला असून देशातील पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढू लागल्या आहेत.

दरम्यान, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून इंधनाच्या किंमती वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र सप्टेंबरपासून किंमती वाढविणे बंद करण्यात आले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती या 20 डॉलरवर आल्या होत्या. दीड महिन्यांपूर्वी इंधनाच्या दरात 1.19 रुपयांची घट झाली होती. यानंतर 48 दिवसांपर्यंत किंमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. या किंमती गेल्या आठवड्यापासून पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे गेल्या पाच दिवसांत पेट्रोल 53 पैशांनी महाग झाले आहे, तर डिझेलच्या किंमतीत 95 पैशांची वाढ झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button