breaking-newsपुणे

पुणे शहरात ‘ भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

पुणे –  राज्यभरात पेट्रोलदरवाढीचा भडका उडाला असताना त्याच्या निषेधार्थ देशभरात विरोधी पक्षांकडून ‘भारत बंद’ ची हाक देण्यात आली होती. त्यानिमित्त सोमवारी (दि.१०) शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. बंदमध्ये सर्वपक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. बंदला काही ठिकाणी लागलेले हिंसक वळण वगळता अन्य ठिकाणी शांततामय वातावरणात बंद पार पडला.

पेट्रोलचा सातत्याने वाढत जाणारे दर यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. महागाईने नागरिकांची डोकेदुखी वाढत चालली असताना ती दूर करण्यासाठी सरकारकडून कुठलीच दखल घेतली जात नाही. यामुळे सरकारला जाग यावी, तसेच त्यांना जाब विचारण्यासाठी ’’भारत बंद’’ पुकारण्यात आला होता. सरकारी कार्यालये मात्र नियमित सुरु होती. याशिवाय काही शाळांनी बंदमध्ये सहभाग घेतला तर अनेक शाळांचे वर्ग नियमितपणाने सुरु असल्याचे पाहवयास मिळाले. बाजारपेठांमधील सर्व व्यवहार ठ्प्प होते. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळशीबागेत मात्र गजबजाट होता. खरेदीकरिता गर्दी होती. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता या रस्त्यांवरील दुकाने बंद होती. शनिवार, नारायण, रविवार पेठेतील दुकानदारांनी दुकाने अर्धवट बंद करुन  त्यास पाठींबा दिला. सजावटीच्या सामानाकरिता रविवार पेठेतील बोहरी आळीत देखील खरेदीसाठी तुरळक स्वरुपात गर्दी होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button