breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरीत उचलून नेण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पिंपरी :- उचलून नेण्याची धमकी देऊन एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दोन तरुणांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.१७) आणि मंगळवार (दि.१८) या दोन दिवसादरम्यान पिंपरीतील एच.ए.शाळेच्या गेटजवळ आणि खराळवाडीतील खराळआई मंदिरासमोर घडली.

याप्रकरणी पीडित १३ वर्षीय मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कुणाल सुनिल वेताळ (वय १९, रा. पी.जे.चेंबर्स इमारतीच्या पाठीमागे, गांधीनगर, पिंपरी) आणि एम.डी. (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसादरम्यान पिंपरीतील एच.ए.शाळेच्या गेटजवळ आणि खराळवाडीतील खराळआई मंदिरासमोर आरोपी कुणाल वेताळ आणि त्याच्या एम.डी नावाच्या मित्राने पीडित १३ वर्षीय मुलीचा वेळोवेळी पाठलाग करुन, तसेच तिचा हात धरुन “तु माझ्या मित्राला खुप आवडतेस” असे बोलला. यावर मुलीने आरोपींना निघुन जाण्यास सांगितले.

मात्र आरोपींनी पुन्हा तिचा पाठलाग करुन तिचा रस्ता आडवत, तुझी आमच्या बरोबर बोलायची लायकी नाही. तुझ्या पेक्षा चांगल्या पोरी आम्हाला भेटतील, तु जर आम्हाला नाही म्हणालीस तर आम्ही तुला उचलून नेऊ. तसेच तुझ्या घरच्यांकडे पण पाहून घेऊ, अशी धमकी दिली. याप्रकरणी कुणाला आणि त्याचा मित्र एम.डी या दोघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या दोघांना अटक करण्यात आलेली नाही. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button