breaking-newsपिंपरी / चिंचवड

पु.लं.चे अभिवाचन ऐकताना चिंचवडचे रसिक बुडाले हास्यकल्लोळात

  • कलारंग संस्थेच्या वतीने त्रिवेणी संगम कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी, (महा-ई-न्यूज)  – पु.लं.च्या अनेकांचे विविध पैलूंचे केलेले व्यक्तीचित्रण आणि अभिवाचन, अशा विविधरंगी साहित्य, कविता अशा वातावरणांतू पुलंच्या आठवणीत आज पिंपरी-चिंचवडचे रसिक रमून गेले.  आपुलकी, मैत्र या पुलंच्या व्यक्तीचित्र उलगडली. त्याचे अभिवाचन ऐकताना सभागृह हास्यकल्लोळात बुडून गेले.
  • चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात  आज या त्रिवेणी संगम कार्यक्रम झाला.कलारंग सांस्कृतिक कला संस्था कलारंग संस्थेच्यावतीने त्रिवेणी संगम 2019 या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पु.ल.देशपांडे, बाबूजी आणि ग.दि.माडगुळकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम होता. याचे उदघाटन  राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, महापौर राहूल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, प्रमोद निसळ, बंधुता प्रतष्टानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, मधुकर बाबर, स्थायी समितीचे नवनिर्वाचित सदस्य शीतल शिंदे, स्वप्निल म्हेत्रे, शारदा सोनावणे, भाऊसाहेब कोकाटे, उमा खापरे,  राजेंद्र घावटे, पितांबर लोहार, विश्वास मोरे,  माजी उपमहापौर शैलजा मोरे, शर्मिला बाबर, कमल घोलप, सुजाता पालांडे, सुरेश पाटोळे,  आदी उपस्थित होते.
गायिका स्वप्नजा लेले व गायक संदीप उबाळे यांच्या सुमधुर गायनांचा आस्वाद रसिकांना घेतला.  बाबूजी आणि ग.दि.मा़डगूळकर यांच्या गाण्यांना रसिकांनी दाद दिली. त्यात  “या सुखांनो या,” “तोच चंद्रमा नभात,” “का रे दुरावा का रे अबोला,”  “माझे जीवन गाणे,” “राजहंस सांगतो,” “एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे,” “धुंद एकांत हा,” “बाई मी पतंग उडवित होते,” “कानडा राजा पंढरीचा” व “सैनिकहो तुमच्यासाठी” या गाण्याने कार्यक्रमाचा शेवट झाला. तत्पूर्वी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवान, अभिनेते रमेश भाटकर, बहुआयामी असलेले व्यक्तिमत्व सरोज राव यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.  त्यांना हार्मोनियम अमित कुंटे, ढोलकी अपूर्व द्रविड, -हिदम-सोहम वंगे, सिंथेसायझर केदार परांजपे, प्रसन्न वाम यांनी केली. तर निवेदक म्हणून रवींद्र खरे यांनी काम पाहिले.
  • अतुल परचुरे यांनी पु.ल. देशपांडे यांची भूमिका साकारलेली. मला भावलेले पु.ल. यावर अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी मुलाखत घेतली.  अतुल परचुरे म्हणाले, भाईंची कॉपी कधीही आणि कुणाला करता येणे अवघड आहे. भाई ज्यांना समजले त्यांनाच ती भूमिका करता येते. आणि ती भूमिका मला करायला मिळणे हे मी माझ भाग्य समजतो. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे. व्यक्ती आणि वल्लीमधील भाईंची भूमिकेसाठी माझ सुचणे हे मी माझ्या कामाची पावती समजतो.
“आपल्या बहुआयामी लेखनातून पु.ल. देशपांडे यांनी साहित्य विश्‍वात मोलाची भर घातली आहे. विनोदी लेखन, प्रवासवर्णने, नाटक, व्यक्तिचित्रणात्मक लेखन अशा विविधांगी लेखनातून त्यांनी मराठी साहित्य तर प्रगल्भ केलेच आहे, शिवाय रसिकांना दर्जेदार साहित्याची देणगीही दिली आहे. पु.लं.च्या साहित्याने आजही मोहिनी घातली.
  • राज्यलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन म्हणाले,  कोणत्याही क्षेत्रात कोणाशीही स्पर्धा करु नका. स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:;चे असे स्थान निर्माण करा.  बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे म्हणाले,  पु.ल.देशपांडे, ग. दि.माडगूळकर, बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त का होईना त्यांच्या आठवणींना उजाळा मिळतो.
पुलंची प्रवासवर्णने, भाषिक ताकद त्याचबरोबर पुलंच्या बहुभाषित्वाचे पैलु रसिकांसमोर अभिनेते अतुल परचुरे यांनी उलगडले. यावेळी पुलंनी लिहिलेल्या काही पत्रांचे संदर्भ वाचन ही अभिनेते राहूल सोलापूरकर यांनी  केले. पुलंमुळे ख-या  अर्थाने व्यक्तीचित्र आणि प्रवासवर्णनांना प्रतिष्ठा प्राप्त झाली या अर्थाचे वाक्‍य आणि पुलंचा हजरजबाबीपणा रसिकांसमोर उलगडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित गोरखे यांनी केले. तर आभार शैलेश लेले यांनी मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button