breaking-newsमनोरंजन

डार्क मेकअपमुळे स्वरा भास्कर ट्रोल, नेटकऱ्यांनी दिला शेव्हिंग करण्याचा सल्ला

नेहमीच वादग्रस्त ट्विट करत चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर अनेक वेळा तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असते. यावेळी देखील तिच्यासोबत असंच काहीसं झालं आहे. ३१ ऑक्टोबर रोजी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी हॅलोविन पार्टी सेलिब्रेट केली. या पार्टीमध्ये स्वराने केलेल्या मेकअपमुळे तिला ट्रोल व्हावं लागलं आहे. इतकंच नाही तर काही नेटकऱ्यांनी तिला मिशी तरी काढायची होतीस असं म्हणत ट्रोल केलं आहे.

स्वराने हॅलोविन पार्टीमध्ये ऑफ शोल्डर टॉप आणि लांब स्कर्ट परिधान केला होता. त्यासोबतच तिने युनिक हेयडो आणि डार्क मेकअप केला होता. मात्र तिचा हा हटके लूक चाहत्यांना मात्र फारसा आवडलेला दिसत नाही. त्यांनी स्वराला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या पार्टीमध्ये स्वराने डोक्यावर फुलांची हेअर स्टाइल केली असून डार्क मेकअप केला आहे. हा मेकअप ओठांवरही करण्यात आल्यामुळे ओठांवरील काही भाग काळ्या रंगाचा दिसत आहे. विशेष म्हणजे तिचा हा मेकअप पाहिल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.


”जर तुमच्या आसपास झाडं नसेल तर फुलांचा गुच्छ व्हावा. केवळ दिल्लीचेचं नागरिक जाणतात की प्रदूषणाची समस्या कशी हाताळायची”, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने मीम शेअर करत, “आधी मिशा तरी काढायच्यास” असा टोला लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button