breaking-newsपुणेमुंबई

मुंबई-पुणे महामार्गावरील ऐतिहासिक अमृतांजन पूल जमीनदोस्त

बोरघाटातून मुंबई पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल आज (रविवार) तोडण्यात आला. सध्या करोनामुळे असलेल्या लाॅकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याचे निमित्त साधत हे काम करण्यात आले. द्रुतगती मार्ग झाल्यानंतरही अमृतांजन पूलाच्या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होती. हा द्रुतगती मार्ग जरी झाला असला तरी या पुलाजवळील काही प्रवासी पट्टा जुन्या महामार्गाला व द्रुतगती मार्गाला सामाईक आहे त्यामुळेच येथे कायम वाहतूक कोंडी होत असते. यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून पर्यायी मार्ग व उड्डाण पुलांचे काम सुरू आहे. दरम्यान जीर्ण झालेला व अडचणीचा ठरत असलेला हा ऐतिहासिक पूल आज  पाडण्यात आला आहे.

त्यामुळे  पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावरील हा १९० वर्षे जुना अमृतांजन पूल आता  इतिहास जमा झाला आहे. आज सायंकाळच्या सुमारास हा पूल पाडण्यात आला तेव्हा त्या ठिकाणी काही प्रशासनातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. अनेक दिवसांपासून हा पूल पडायचा होता. परंतु, द्रुतगतिमार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते, त्यामुळे ते शक्य होत नव्हते. मात्र, सध्या करोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतमार्गावरील वाहतुक कमी आहे. त्यामुळे हा सर्वात जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्यात आला. १० नोव्हेंबर १८३० साली अमृतांजन पूल बांधण्यात आला होता.

पुुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूकीस अमृतांजन पूलाचा अडथळा होत असल्यामुळे पाडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने काही महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यानुसार पूल पाडण्याचे नियोजन सुरु होते, मात्र महामार्गावरील वाहतुकीमुुळे ते शक्य होत नव्हते. करोनाच्या पार्श्वभूमीवर अवघा देश लॉकडाऊन असून याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. तसेच द्रुतगतीमार्गावर देखील वाहतूक नेहमीच्या प्रमाणात खूप कमी आहे. सध्याची वाहतूक जुन्या महामार्गाने वळवण्यात आली आहे.

त्यामुळे आज रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास (कंट्रोल बास्टिंग) पद्धतीने हा पूल पाडण्यात आला आहे. पुलाखाली अत्यंत धोकादायक वळण आहे. तिथेच जास्त अपघात घडत होते, अनेकदा कंटेनर ही अडकत होते. त्यामुळे हा पूल पाडणे गरजेचे होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button