breaking-newsपिंपरी / चिंचवड

डायनोमर्क कंट्रोलमध्ये 48 वा औद्योगिक सुरक्षा सप्ताह

भोसरी ( महा ई न्यूज ) – भोसरी येथील डायनोमर्क कंट्रोलमध्ये 48 व्या औद्योगिक सुरक्षा सप्ताहनिमित्त कामगारांना शपथ देवून सांगता करण्यात आली. सुरक्षा सप्ताह कंपनीत निबंध स्पर्धा, भित्तीचित्रेद्धारे चर्चा सत्र घेवून कामगारात जनजागृती करण्यात आली.
मनुष्यबळ विकास प्रमुख सूर्यकांत मुळे यांनी कामगारांना सूरक्षेतेची शपथ दिली. सुरक्षित साधना शिवाय काम न करण्याचे आव्हान करून प्रत्येक कामगारांनी आपआपल्या मशीनची वेळोवेळी दूरूस्ती करावी, असे सांगितले. व्यवस्थापकीय संचालक किशोर राऊत म्हणाले की, महाराष्टात 2018 रोजी  13,000 लोकांचा अपघाती मृत्यू झाला. यामध्ये 25 तें 45 वयाच्या नागरिकाचे प्रमाण जास्त आहे, 90% प्रमाण हे मानवी चुकीमुळे झाल्याचे निदर्शनास आले. आम्ही सेफ्टी होल्ड लाईफ इज गोल्ड, असे म्हणत कामगार सुरक्षित तर कंपनी सुरक्षित, पर्यायाने कामगारांचे कुटुंब सूरक्षीत, सर्व कामगार माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत ते तंतदुरुत्त रहावे, हिच अपेक्षा. त्यांनी व्यक्त केली. सर्वाना सुरक्षित काम करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
यावेळी विभाग प्रमुख हेमंत नेमाडे, प्रविण बाराथे,मोहनकृनन,हर्षल शेळके, दिलीप ईधाते, राजेश वैद्य,अक्षरा राउत,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आन्ना जोगदंड, प्रिया देशमुख,पंडित वनसकर, शिंदे बाळासाहेब  ईत्यादीनी परीश्रम घेतले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button