breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वच्छतेत पिंपरी-चिंचवड खड्यात; आयुक्तांचा ‘कच-यांचा बुफे’ देवून सत्कार

  • विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्याकडून प्रशासनाचा निषेध
  • भाजपच्या कार्यकाळात क्लीन सिटी बनली डर्टी सिटी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – स्वच्छ व सुंदर शहराचा तोरा मिरवणा-या पिंपरी-चिंचवड शहर दिवसेंदिवस स्वच्छ भारत अभियानात पिछाडीवर पडू लागले आहे. एकेकाळी पिंपरी-चिंचवड देशात नवव्या स्थानी होते. त्यावेळी क्लीन सिटी आणि बेस्ट सिटीचे पारितोषिकही मिळाले. परंतू, मागील दोन वर्षात स्वच्छ भारत अभियान सर्वत्र राबवूनही पिंपरी-चिंचवड शहराची स्वच्छतेत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे यंदा स्वच्छ भारत अभियानात पिंपरी-चिंचवड शहराचा देशात 52 वा स्थान पटकाविले आहे. या घटनेचा निषेध म्हणून महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांना कच-यांचा बुफे देवून त्याचा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी सत्कार केला. तसेच प्रशासनाचा निषेधही व्यक्त केला. 

यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन देण्यात आले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छतेबाबत बेस्ट सिटी पुरस्कार राष्ट्रवादीच्या कार्यकाळात मिळाला होता. पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेत महाराष्ट्रात नंबर वन व देशात नवव्या क्रमांकावर होते. परंतू भाजप सत्तेत येवून दोन वर्ष झाल्यानंतर सन २०१७ मध्ये  ७२ व्या स्थानी गेले. तर सन २०१८ साली  शहर स्वच्छतेबाबत ४३ नंबरवर गेले. आता परत सन २०१९ साली ५२ व्या क्रमांकावर गेले.

स्वच्छता अभियानाच्या फक्त जाहिराती सुरु आहेत. प्रत्यक्षात भाजपाचा आणि आपला कारभार  नियोजन शुन्य आहे. भाजपच्या पदाधिका-यांचे  फक्त मलई खाण्यावर लक्ष असल्यामुळे अद्याप कच-याची समस्या गंभीर झालेली आहे. भाजपच्या पदाधिका-यांनी कचरा सुध्दा सोडला नाही. त्यामुळे त्यांनी शहराचा कचरा करुन टाकला आहे. बेस्ट सिटीची भाजपाने कचरा सिटी करुन टाकली आहे.  भाजपाच्या चुकीच्या धोरणामुळे शहरात सर्वत्र कच-यांचे ढीग साठले आहेत. कचरा विलनीकरणाचा बोजवारा उडाला आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शहरातील एक रेल्वे स्टेशन, एक बसस्टॉप, एक चौक व एक रस्ता, एक झोपडपट्टीची पाहणी करुन गुण दिले जातात. त्यावेळी आम्ही पत्र क्र./ विपने/१७/२०१९ दि. २१/१/२०१९ अन्वये शहरातील चिखली परीसर, चिंचवड स्टेशन येथील आनंदनगर झोपडपट्टी, विद्यानगर झोपडपट्टी, रामनगर गांधीनगर या परीसरात जाऊन तेथील सार्वजनिक शौचालय, मुता-या, रस्ता , कचरा इत्यादीबाबत पाहणी करणेबाबत सुचविले होते.

या भागाची पाहणी जर सदस्यांनी केली असती तर आता जो ५२ वा नंबर आला आहे तो तर सोडाच पण पहिल्या १०० मध्ये आपल्या शहराचा समावेश झाला नसता. घरोघरचा कचरा संकलित करणे, गटार व रस्ते  स्वच्छता, कच-याची मोशी डेपोपर्यत वाहतूक करणे, डेपोत कचरा विलनीकरण करुन त्यावर प्रक्रीया करणे या बाबींतील त्रुटीमुळे शहर पिछाडीवर पडलेले आहे.

सत्ताधारी भाजपाच्या पदाधिका-यांच्या टक्केवारीच्या राजकारणामुळे , २०१६ मध्ये देशात नवव्या व राज्यात पहिल्या क्रमांकवर असणारे पिंपरी चिंचवड शहर एकदम पिछाडीवर कसे पडले. देशात,राज्यात एवढेच नव्हे तर पालिकेत भाजपची सत्ता असताना शहराची अवनती कशी झाली याचे उत्तर भाजपा सत्ताधा-यांनी  आणि प्रशासनाने द्यावे.

 आरोग्य प्रशासनच्या अक्ष्यम दुर्लक्षामुळे सन २०-१९ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ४३ व्या स्थानावरुन ५२ व्या स्थानावर गेले आहे. गेल्या दोन वर्षातील आपली कौतुकास्पद कामगिरीची आम्ही दखल घेत, शहराला  या स्थानावर जाण्यासाठी प्रामाणिकपणे आपण प्रयत्न केल्याबाबत आपला पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button