breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डाई-ईची कंपनीच्या स्थलांतरास कामगारांचा विरोध, कंपनीसमोर ठिय्या आंदोलन सुरु

पिंपरी –  कासारवाडी येथील डाई-ईची कंपनीचे व्यवस्थापनाने बेकायदेशीररित्या स्थलांतर सुरु केले आहे. त्याला कंपनीतील कामगारांनी तीव्र विरोध केला असून, शनिवार (दि.25) कंपनी प्रवेशव्दारासमोर हिंद कामगार संघटनेच्या (इंटक) वतीने ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

डाई-ईची करकरिया ही कंपनी कासारवाडी येथे 54 वर्षापूर्वी सुरु करण्यात आली. या कंपनीत उत्पादनाशी संबंधित शेकडो कामगार काम करीत आहेत. परंतू मागील काही दिवसांपासून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना व कामगार संघटनेला पूर्णत: अंधारात ठेवून अचानकपणे कंपनी गुजरात येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कंपनीतील मशिनरी काढून गुजरातकडे रवाना करण्यात येत आहेत. कामगारांना देशोधडीला लावणारा हा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने कामगार संघटना, राज्य सरकार, उद्योग मंत्रालय, श्रम मंत्रालय यांना सर्वांना अंधारात ठेवून घेतला आहे. या विरोधात हिंद कामगार संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेत स्थगिती आदेश मिळविला आहे.

कंपनी व्यवस्थापनाने यापूर्वीच कोणतीही लेखी सूचना न देता कामगारांची बस आणि कॅन्टिन सुविधा बंद केली आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी रात्री अपरात्री कामगारांच्या डोळ्यात धूळफेक करून कंपनी व्यवस्थापन मशिनरी हलविण्याचे काम करीत आहे. कामगारांची ही फसवणूक लक्षात आल्यामुळे कामगारांनी ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

कंपनी व्यवस्थापाने कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, सर्व कामागरांना पूर्वीप्रमाणे 60 दिवसांची ग्रॅज्यूईटी व जे कामगार 2008 सालानंतर सेवानिवृत्त झालेत त्यांनाही फरकासह ग्रॅज्यूईटी मिळावी, कायद्याप्रमाणे फरकासह बोनस मिळावा, कंपनीने पूर्वीप्रमाणेच उत्पादन सुरु करून ज्या कामगारांना खोट्या आरोपांपोटी कामावरून काढून टाकले आहे त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे, कंपनी स्थलांतरीत करण्याचे हे काम कंपनी व्यवस्थापनाने ताबडतोब बंद करावे, तसेच आतापर्यंत या कपंनीतून बाहेर पाठविण्यात आलेली मशीनरी पुन्हा कंपनीत आणून उत्पादन सुरु करावे, याबाबत हिंद कामगार संघटनेकडून न्यायालयात लढा लढतच आहे. कंपनी व्यवस्थापनाने सर्व उत्पादन पूर्ववत सुरु करून कामगारांच्या न्याय हक्क मागण्या मान्य कराव्यात अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button