breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ठेकेदाराशी सह शहर अभियंत्याचे आर्थिक लागेबांधे – नगरसेविका पाैर्णिमा सोनवणे याचा आरोप

पवना जलवाहिनी प्रकल्पास थेट सल्लागारासह जून्या ठेकेरादाला काम देण्यास विरोध

पिंपरी |महाईन्यूज|

पवना जलवाहिनीचा सुधारित प्रकल्प आराखडा बनवण्यासाठी थेट पध्दतीने पुर्वीच्याच सल्लागार कंपनीसह जून्याच ठेकेदाराला काम देण्याचा खटाटोप सुरु आहे. या प्रकल्पाला शेतक-यांचा विरोध आहे. संपुर्ण जागेचे भूसंपादनही झालेले नाही. तरीही महापालिका आयुक्तांच्या सल्लाने सह शहर अभियंता रामदास तांबे यांच्याशी संबंधित सल्लागार कंपनीसह ठेकेदाराशी असलेल्या आर्थिक लागेबांधेमुळे करदात्या नागरिकांचे सुमारे सातशे ते आठशे कोटी रुपये पाण्यात जाणार आहेत. असा आरोप स्थायी समिती सदस्य तथा नगरसेविका पाैर्णिमा सोनवणे यांनी केला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात शंभर टक्के पाणी साठा आहे. आज स्थितीला शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत आहे. नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. मात्र अमृत योजनेतून 24 तास पाणीपुरवठा झालेला नाही. नागरिकांच्या आजही तक्रारी आहे. त्या योजनेचे काम संथगतीने सुरु असून त्या ठेकेदारावर देखील कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतू, तो ठेकेदाराला मुदतवाढ दिली जात आहे.

पवना जलवाहिनी प्रकल्पावर आजपर्यंत दीडशे ते दोनशे कोटीचा खर्च झालेला आहे. सुधारित प्रकल्पात तो खर्च सुमारे सातशे ते आठशे कोटीच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात बाजारभावानूसार तो एक हजार कोटीही होईल. मुळात त्या प्रकल्पाचे शंभर टक्के भूसंपादन झालेले नाही. तरीही प्रकल्प सुरु करण्याची हातघाई केल्यास महापालिकेला आर्थिक भूर्दंड सोसावा लागेल. या प्रकल्पावर तत्कालीन मुख्यमंत्री व जिल्हाधिका-यांचे स्थगिती आदेश आहे. तो आजही कायम आहे. तरी सुध्दा वादग्रस्त ठेकेदार व सल्लागार कंपनीला काम देण्यात येत आहे.

मुळात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कुठलेही काम थेट पध्दतीने न देता त्या निविदा प्रक्रिया राबवून देण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, निविदा न मागविता थेट सल्लागार कंपनी नियुक्ती आणि आता संबंधित ठेकेदाराला पायघड्या घालण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे या प्रकल्पात सहशहर अभियंता रामदास तांबे यांची भूमिका संशयास्पद आहे.

याबाबत सत्ताधारी भाजपकडून स्थायी समितीत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार सुरु आहे. आम्हाला बोलूच दिले जात नाही. पवना जलवाहिनी प्रकल्पात जूनाच सल्लागार आणि ठेकेदाराची नियुक्ती झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच सह शहर अभियंता रामदास तांबे यांचे ठेकेदाराशी आर्थिक हितसंबंध असून त्यांची खातेनिहाय सखोल चाैकशी करावी. अशीही मागणी सोनवणे यांनी केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button