breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कणादने सर्वात उंचीवरील मंदिरापर्यंत पोहचत फडकविला तिरंगा

पिंपरी |महाईन्यूज|

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त कणादने वयाच्या तेराव्या वर्षी हिमालयात १३ हजार फुटांपर्यंत केलेल्या ट्रेकिंगची आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नुकतीच नोंद झाली आहे.

गढवाल हिमालयातील ‘गंगोत्री ते गोमुख हा ट्रेक आणि ‘चंद्रशीला पर्वत’ चढाई करुन कणाद पिंपळनेरकर याने हा विक्रम प्रस्थापित केला आहे. २१ ते २५ सप्टेंबर दरम्यान त्याने केलेल्या पदभ्रमणाच्या पहिल्याच प्रयत्नात कणादने गांगोत्रीपासून गोमुखपर्यंत चढाई केली. मात्र खराब हवामानामुळे आणि धोकादायक रस्त्यामुळे समुद्रसपाटीपासून १२ हजार ४०० फूट उंचावर असणाऱ्या भोजबास या ठिकाणापर्यंतच पोहोचण्यात यशस्वी ठरला. हा मार्ग गंगोत्रीहून एकेरी १४ किलोमीटरचा आहे.

केदारनाथ ते बद्रीनाथ या रस्त्यावर चोपता या ठिकाणी चंद्रशीला पर्वत आहे. चंद्रशीला पर्वतावरील “तुंगनाथ” हे महादेवाचे जगातील सर्वात उंचीवरील मंदिर आहे. या चढाईत अरुंद पायवाट, अंगावर येणारा चढ आणि दाट धुक्यासोबत वाहणारे अतिथंड वारे यांचा सामना कणादला करावा लागला. गोमुखला १३ हजार फूट उंची गाठण्याची संधी हुकल्यानंतर कणादने जिद्दीने चंद्रशीला पर्वत माथ्यावर पोहोचत १३ हजार फूट उंची गाठण्यात यश मिळविले. माथ्यावरच्या मंदिरातील गंगामातेचे दर्शन घेऊन कणादने तिरंगा फडकवला.

आजवर कोणत्याही सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलाने अशी कामगिरी केली नसल्याने कणादने हिमालयात केलेल्या या चढाईची “आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्” या संस्थेने दखल घेवून त्याला ‘ग्रॅंड मास्टर’ या किताबसह, प्रमाणपत्र आणि मेडल देऊन सन्मानित केले आहे.

कणादच्या हिमालयातील या पहिल्याच कामगिरीची ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ ने विक्रम म्हणून नोंद केल्याने आमचाही आत्मविश्वास आणि आनंद द्विगुणित झाला आहे. विशेष मुलांच्या पालकांनी या मुलांची आवड लक्षात घेवून वाव दिल्यास प्रत्येकाला असे यश प्राप्त करणे शक्य आहे” अशी भावना कणादच्या आई दर्शना आणि वडील प्रशांत पिंपळनेरकर यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button