Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

महाराष्ट्र सोमवारी बघेल, चमत्कार होईल का काय होईल हे दिसेल : अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत विधान परिषद निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहा उमेदवार विजयी होतील, असं अजित पवार म्हणाले. राज्यसभेत काय झालं ते सर्वांनी पाहिलं आहे. सभागृहात कधी काय होईल हे सांगता येत नाही. आम्ही सगळे जण दक्षता घेत आहोत. कोटा कसा जास्त देता येईल यासाठी प्रयत्न करत आहोत, असं अजित पवार म्हणाले. शिवसेनेचे दोन उमेदवार व्यवस्थितपणे निवडून येतील. शिवसेनेनं शंकरराव गडाख, बच्चू कडू आणि राजेंद्र यड्रावकर यांची मत सेनेला मिळणार आहेत. प्रत्येक पक्ष स्वत:च्या पातळीवर प्रयत्न करत आहेत. आमच्या आमदारांना एकत्र बोलावलं जाईल त्यांना १ ते १० पसंतीक्रम कसा द्यायचा यासंदर्भात माहिती देणार आहोत. १ ते २ आकडे आमच्या उमदेवारांना दिले तरी ३ ते ४ क्रमांक कुणाला द्यायचा हे शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील हे अंतिम क्षणी निर्णय घेतील, असं ठरल्याचं अजित पवार म्हणाले.

काही उमेदवारांनी अपक्ष आमदारांना फोन केल्याचं खर आहे. मात्र, तीन ते चार उमेदवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्याप्रमाणं ते मतदान करतील, असं सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.आमच्या आमदारांना राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. आमच्या पक्षातील आमदारांवर दबाव करण्यात टाकण्यात आल्याची माहिती अजून तरी मिळाली नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचे दोन उमेदवार निवडून येणार

शिवसेनेचे दोन उमेदवार सहजपणे निवडून येतील, असं चित्र आहे. आमच्या दोन आमदारांना मताची परवानगी देण्यात आली नाही त्यामुळं अपक्षांची मदत घेऊन आमदारांना कसं निवडून आणायचं याचं नियोजन करतो आहे, असं अजित पवार म्हणाले. अपक्ष आमदार देखील पाच पाच लाख लोकांचं प्रतिनिधीत्व करतात. अपक्ष आमदारांचा सन्मान करुन त्यांचं मत आपल्या उमेदवारांना कसं विजयी करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे, असं अजित पवार म्हणाले.

राजकीय पक्षांचे आमदार त्यांच्या पक्षांना मतदान करतील. अपक्ष आमदारांनी त्यांच्या सदसदविवेक बुद्धीला स्मरुण मतदान करावं. विधानपरिषदेची निवडणूक सोमवारी होत आहे. चमत्कार होईल का होईल ते सोमवारी दिसेल. महाराष्ट्र काय होईल ते पाहिल, असं अजित पवार म्हणाले. ज्या उमेदवाराला २६ पेक्षा कमी मत मिळतील त्याचा पराभव होईल,अजित पवार यांनी म्हटलं.अग्निपथ योजनेवरुन तरुणांनी राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करु नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button