breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डॉ. गिरीश प्रभुणे यांचे आमदार लक्ष्मण जगतापांनी केले अभिनंदन

पिंपरी | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील भटक्या समाजातल्या मुलामुलींचे शिक्षण व कौशल्यविकास यासाठी आपले जीवन वेचणारे आणि आपल्या प्रभावी लेखनातून भटक्या-विमुक्तांच्या अपरिचित जगाचे वास्तव सातत्याने मांडणारे पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश प्रभुणे यांना केंद्र शासनाचा “पद्मश्री” पुरस्कार जाहीर झालेला आहे. या पुरस्काराने पिंपरी चिंचवडच्या नावलौकिकात भर पडली असून पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी (दि. २६) डॉ. गिरीश प्रभुणे यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले आहे. चिंचवडगावातील पुनरूत्थान समरसता गुरूकुलममध्ये जाऊन आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे देखील उपस्थित होते.

त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवडवासीयांच्या वतीने महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनीही गुरूकुलममध्ये जाऊन गिरीश प्रभुणे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर केशव घोळवे, नगरसेवक बाबू नायर, भाजपचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, नगरसेविका शारदा सोनवणे आदी उपस्थित होते.

चिंचवडगावात राहणारे गिरीश प्रभुणे यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान बहुमूल्य आहे. भटक्या-विमुक्त समाजाच्या विकासासाठी त्यांनी आयुष्य वेचलेले आहे. भटके-विमुक्त विकास परिषदेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते अविरत कार्य करीत आहेत. वैदू, कैकाडी, पारधी इत्यादी समाजातील मुलांच्या कल्याणासाठी ते झटत असून चिंचवड येथील “पुनरुस्थान समरसता गुरुकुलम”मध्ये भटक्या समाजातील साडेतीनशे मुलामुलींचे शिक्षण व कौशल्यविकास यासाठी ते विशेष प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आपल्या प्रभावी लेखनातून भटक्या समाजाचे अपरिचित वास्तव मांडलेले आहे.

वाचा- भारतीय लहुजी पँथरच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button