breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ठाणे परिसरातील ८ बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा

ठाणे |महाईन्यूज|

ठाण्यातील कळवा, मुंब्रा, डायघर आणि दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळ करीत असल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडे वाढत होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पोलिस आयुक्तांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश ठाणे गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने कळव्यातील ८ बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

अलोक सुभाषचंद्र सिंह (39), रामजीत कंचन गौतम (47), गोपाल बाबू विश्वास (47), रामतेज मोहन प्रसाद (50), सुभाषचंद्र राजाराम यादव (47), जयप्रकाश लालजी विश्वकर्मा (40), दीपक बाबू विश्वास (48), सत्यनारायण लालमन बिंद (42) अशी अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. या डॉक्टरांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात सलाईन, इंजेक्शन व अलोपॅथी औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेच्या तपासातून बोगस डॉक्टरांना बनावट पदवी देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

काही डॉक्टर त्यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना ठाण्यातील कळवा, मुंब्रा, डायघर आणि दिवा परिसरात बेकायदेशीररीत्या दवाखाना थाटून रुग्णाच्या जीवाशी खेळत होते. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत होती. या तक्रारींची गंभीर दखल ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेऊन कारवाईचे आदेश गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने महाराष्ट्र कॉन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, मुंबई या संघटनेशी पत्रव्यवहार करून बोगस डॉक्टरांवर कारवाई प्रकरणी मदत करण्यात यावी अशी मागणी केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button