breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

Bharat bandh : 10 वर्षापूर्वीचं सांगू नका, आजचं बोला, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई – देवेंद्र फडणवीसांनी आजचं बोलावं, गेल्या 10 वर्षांपूर्वीचं बोलू नये. आपण काय बोलतोय, याचा 10 वेळा विचार करावा, असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला आहे.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधातील बंदला देशभरात चांगला प्रतिसाद असून लोकं उत्स्फुर्तपणे बंदमध्ये सहभागी होत आहेत. सरकारने मनं मोठं करून विचार केल्यास, आंदोलनामुळे तणावाखाली येण्याची सरकारला गरज नाही. कारण, कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची व्यथा ऐकायलाच हवी, असे आवाहन संजय राऊत यांनी केलंय.

अवश्य वाचाः शेतकरी भारत बंदचे फोटो सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई, खासदार राजीव सातव यांचा आरोप

उत्खनन करायचं म्हटलं की हे लांबपर्यंत जाईल, तुम्ही 10 वर्षापूर्वीचं बोलू नका, आज काय चाललंय ते पाहा. शेतकरी आज रस्त्यावर आहे. आजचा बंद ना शिवसेनेनं पुकारला, ना राष्ट्रवादीने, ना तृणमूल काँग्रेसने आवाहन केलंय. जो शेतकरी रस्त्यावर उतरलाय, त्यास कुठलंही राजकीय पाठबळ नाही, हे राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी समजावून घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या हातात कुठलाही राजकीय झेंडा नाही, आपण विरोधी पक्षनेते म्हणून काय भूमिका मांडतोय याचा फडणवीसांनी 10 वेळा विचार करायला हवा, असा टीका खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

अवश्य वाचाः ‘७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारत बंदमध्ये सहभागी व्हा’

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बाजार समित्यांची मक्तेदारी संपवून पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे समर्थन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने नेहमीच केले. आघाडी सरकारच्या काळातच त्यासाठीचे कायदेही झाले. आता त्यांच्याकडून होत असलेला विरोध हा निव्वळ दुटप्पीपणा असून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका केली होती. शिवसेनेच्या भूमिकेवरही फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यासंदर्भात पत्रकारांनी संजय राऊत यांना विचारले असता त्यास सडेतोड उत्तर दिले.

शेतकरी आज कोणत्याही संकटाला तोंड देण्यास सज्ज आहे. ही परिस्थिती का आली, यासंदर्भात राजकीय अभिनवेश बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार केला, तर देवेंद्र फडणवीस हेही शेतकऱ्यांच्या बाजुने उभे राहतील, असेही राऊत यांनी म्हटलंय.

अवश्य वाचाः कृषी विधेयक : भ्रम आणि वास्तव…आमदार महेश लांडगेंची जनजागृती!

शरद पवार यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकात त्यांनी, शेतकऱ्याला आपला माल कुठेही विकता यावा, बाजार समित्यांची मक्तेदारी मोडीत काढायला हवी. शेतीमाल बाजार समितीतच विकण्याचे बंधन नसावे असे मत व्यक्त केलेले आहे. शरद पवार यांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना बाजारपेठांमध्ये खासगी गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करणारे आणि मॉडेल प्रतिपादित करणारे पत्र देशातील मुख्यमंत्र्यांना लिहिले होते, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button