breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“ट्रेन कॅप्टन’ सोडविणार प्रवाशांच्या तक्रारी

  • 9 जणांची नियुक्ती : मेल आणि एक्‍स्प्रेस गाडीत सुविधा

पुणे – लांब पल्ल्याच्या रेल्वेत प्रवाशांना येणाऱ्या अडचणी जागेवरच सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ट्रेन कॅप्टनची नियुक्ती केली आहे. यासाठी ट्रेन कॅप्टन हे नवीन पद निर्माण करण्यात आले आहे. दरम्यान, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने अशा 9 जणांची नियुक्ती केली आहे. मेल आणि एक्‍स्प्रेस रेल्वेंमध्ये प्रवाशांच्या सुविधांसाठी ट्रेन कॅप्टनचा “रोल’ महत्त्वाचा ठरणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार, रेल्वेतील वरिष्ठांना “कॅप्टन’ म्हणून काम करण्याची संधी दिली जात आहे. त्यानुसार देशभरातील प्रमुख रेल्वेमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची नावे, मोबाइल क्रमांक ही माहितीदेखील प्रदर्शित केली जात आहे.
प्रवाशांना सुरक्षा, डब्यांमधील पंखा बंद, पाणी नसणे, लाइट न लागणे, शौचालयातून दुर्गंधी, आरक्षित डब्यांमधून अनारक्षित तिकिटांवर प्रवास, वातानुकूलित यंत्रणेत बिघाड, अनधिकृत वेंडर्सकडून चढ्या भावाने खाद्यपदार्थ विक्री, चोरी, छेडछाड, महिला डब्यात पुरूष प्रवासी अशा अनेक अडचणी येतात. यापूर्वी प्रवाशांकडून तिकीट तपासणीसाकडे (टीसी) याची तक्रार केली जात होती. मात्र, बऱ्याचदा त्यांची दखल घेतली जात नसे. यामुळे संपूर्ण प्रवासात मनस्ताप सहन करावा लागत होता. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने “कॅप्टन’ची नियुक्ती केली आहे. ट्रेन कॅप्टन प्रवाशांच्या तक्रारी जाणून घेईल. यानंतर त्यासाठी रेल्वे सुरक्षा दल, यांत्रिकी विभाग, खानपान आदी सर्व विभाग कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून प्रवाशांच्या अडचणी सोडवणार आहे.
—————–
असे ओळखा “कॅप्टन’ला
रेल्वे धावताना सुरूवातीलाच उद्‌घोषणेद्वारे “कॅप्टन’ची माहिती दिली जणार आहे. पटकन ओळख व्हावी, यासाठी खास गणवेश तयार करण्यात आला असून पांढरा शर्ट, काळा कोट, लाल टाय, बॅज असा कॅप्टनचा पोशाख असणार आहे. या सुविधेचा प्रवाशांना चांगलाच फायदा होणार आहे.
—————–
या ट्रेनमध्ये असतील कॅप्टन (ट्रेन क्र.)

पुणे-भुसावळ एक्‍स्प्रेस (11026)
पुणे-इंदोर एक्‍स्प्रेस (22943)
पुणे-जम्मूतावी झेलम एक्‍स्प्रेस (11077)
पुणे-हावडा आझाद हिंद एक्‍स्प्रेस (12129)
पुणे-मुंबई इंद्रायणी एक्‍स्प्रेस (22106)
यशवंतपूर-जयपूर (पुणे मार्गे) सुविधा एक्‍स्प्रेस (82653)
म्हेैसूर-उदयपूर (पुणे मार्गे) हमसफर एक्‍स्प्रेस (19668)
म्हेैसूर- अजमेर-अजमेर एक्‍स्प्रेस (16210)
भावनगर एक्‍स्प्रेस- पुणे मार्गे (17204)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button