breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

ट्रम्प यांचा दौरा संपल्यानंतर झोपडपट्ट्यांच्या समोरील भिंती पाडणार काय? शिवसेनेचा सवाल…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादेतील झोपड्या लपवण्यासाठी भिंती बांधल्या जात आहेत. या मुद्द्यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 

मोदी १५ वर्ष गुजरात राज्याचे ‘बडा प्रधान’ आणि आता ५ वर्ष संपूर्ण देशाचे ‘बडा प्रधान’ असतानाही गुजरातची गरिबी आणि बकालपणा लपवण्यासाठी भिंती उभारण्याची नामुष्की का यावी? असा खोचक सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. तसंच, ट्रम्प यांचा अहमदाबाद दौरा आटोपल्यानंतर झोपडपट्ट्या लपविणाऱ्या भिंती पाडणार काय? असा सवाल देखील सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे आपल्या देशात मोठीच लगीनघाई सुरु आहे. ट्रम्प काय खातात, काय पितात, त्यांच्या गाद्या-गिरद्या, टेबल, खुर्च्या, त्यांचे बाथरुम, त्यांचे पलंग, छताची झुंबरे कशी असावीत यावर केंद्र सरकार बैठका, सल्लामसलती करीत असल्याचे दिसते. गुलाम हिंदुस्थानात इंग्लंडचा राजा किंवा राणी येत असत तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी असी लगीनघाई होत असे आणि जनतेच्या तिजोरीतून मोठा खर्च केला जात असे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button