breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार
वॉशिंग्टन – यंदा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना देण्यात आला आहे. नोबेल पुरस्कार समितीने सोमवारी यंदाच्या सहाव्या आणि शेवटच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. मिलग्रोम आणि विल्सन यांना हे पुरस्कार ऑक्शन थिअरीमध्ये (लिलाव सिद्धांत) सुधारणा आणि लिलावाच्या नव्या पद्धतींचा शोध लावल्यामुळे देण्यात आला आहे.
नोबेल पारितोषिकांत सुवर्ण पदक, एक कोटी स्वीडिश क्रोना (सुमारे 8.27 कोटी) दिले जाते. स्वीडिश क्रोना हे स्वीडनचे चलन आहे. हा पुरस्कार स्वीडिश वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेलच्या नावे देण्यात आला आहे. यापूर्वी यावर्षीचे नोबेल पुरस्कार रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रासह अनेक क्षेत्रात जाहीर करण्यात आले आहे.