breaking-newsआंतरराष्टीय

मिसाइल हल्ल्याच्या भितीने पाकिस्ताननेच मसूद अझहरला बॉम्बप्रूफ घरामध्ये लपवलं

भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहर सापडत नसल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे. पण भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मसूद अझहरचा पत्ता शोधून काढलेला आहे. बहावलपूरमध्ये रेल्वे लिंक रोडवरील मारकाझ-इ-उस्मान-ओ-अली येथे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आहे. याच मुख्यालयाच्या मागच्याबाजूला सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थेमध्ये एका बॉम्बप्रूफ घरामध्ये मसूद अझहरला ठेवण्यात आलेले आहे.

मसूदला इतकी सुरक्षा का?

पठाणकोट एअर बेस, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला जैश-ए-मोहम्मदचा हा म्होरक्या भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. भारताकडून मिसाइल हल्ला किंवा अन्य मार्गाने मसूदला लक्ष्य केले जाण्याची भिती असल्यामुळे पाकिस्तानने एका बॉम्बप्रूफ घरामध्ये त्याला लपवून ठेवलेले आहे. ‘ब्राह्मोस’ हे भारताचे सर्वात घातक क्षेपणास्त्र असून, ते लक्ष्यावर अत्यंत अचूकतेने प्रहार करण्यासाठी ओळखले जाते.

मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दस्तावेज सोपवले होते. त्यामध्ये २०१६ सालच्या पठाणकोट एअरबेसवरील हल्ल्याच्या तपासात सापडलेला एक मोबाइल नंबर थेट बहालवपूरशी संबंधित होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button