breaking-newsपिंपरी / चिंचवड

‘टीव्ही 9’च्या तोतया बातमीदाराविरोधात भाजपची तक्रार, पोलीस आयुक्तांना दिले निवेदन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

एक अज्ञात इसम वेगवेगळ्या फोन क्रमांकावरून ‘मी टीव्ही ९’चा रिपोर्टर बोलतोय अशी खोटी बतावणी करून भाजपामधील अनेक नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना फोन करीत आहे. उमा खापरे व अमित गोरखे यांना भाजपाने एवढी मोठी जबाबदारी का दिली ? याविषयी आपण सर्वांनी आवाज का उठवू नये ? अशी चिथावणीखोर वक्तव्य करून भाजपामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. आत्तापर्यंत त्यानी वेगवेगळ्या ४ नंबरवरून अनेकांना फोन करून टीव्ही ९ चा रिपोर्टर, असे सांगून चिथावणीखोर वक्तव्य करून पक्षांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत भाजपच्या उमा खापरे व अमित गोरखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी यमुनानगर पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी, म्हणून प्रत्यक्ष पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. यावेळी भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश सचिव अमित गोरखे, भाजप सरचिटणीस व नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, शैला मोळक आदी उपस्थित होते.

या प्रकरणाचा योग्य तो तपास केला जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त यांनी याप्रसंगी दिले आहे. निवेदनावर भाजपा शहर उपाध्यक्ष राजू दुर्गे, भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश सचिव अमित गोरखे, भाजप सरचिटणीस व नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, माजी महिला अध्यक्षा शैला मोळक यांच्या सह्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button