breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

इराणशी झालेल्या अणुकरारातून अमेरिका बाहेर

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आता इराणशी झालेल्या अणुकरारातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना हा करार झाला होता त्यावर त्याचवेळी ट्रम्प यांनी जोरदार टीकाही केली होती. अमेरिका व अन्य चार देशांशी करार करूनही इराणने आपला अण्वस्त्रे तयार करण्याचा इरादा थांबवलेला नाही. त्यांनी गुप्तपणे हे काम सुरूच ठेवल्याचे लक्षात आल्याने त्यांच्यावर आता या करारावर विसंबून राहून चालणार नाही. इराणतर्फे अण्वस्त्रांच्या संबंधात या करारात देण्यात आलेले आश्‍वासन विश्‍वसनीय नाही त्यामुळे आम्ही आता या करारातून बाहेर पडत आहोत अशी घोषणा त्यांनी केली आहे.

इराणाला अणुबॉंम्ब बनवण्यापासून आम्ही रोखू शकत नाही असे माझ्या लक्षात आल्यानंतर या कराराचा काहीही उपयोग नसल्याचेही लक्षात आल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे असे त्यांनी म्हटले आहे. ही घोषणा करतानाच ट्रम्प यांनी इराणवर नव्याने काही निर्बंध लागू केले आहेत. त्या विषयीच्या अध्यादेशावरही त्यांनी लगेच स्वाक्षरी केली.

जगातल्या कोणत्याही देशाने इराणाला अण्वस्त्रांच्या बाबतीत सहकार्य करू नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की अमेरिकेने इराणवर नाहक विश्‍वास ठेऊन त्यांच्याशी हा करार करणेच मुळाच चुकीचे होते. सन 2015 मध्ये व्हिएन्नात इराण आणि अमेरिकसह संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळातील अन्य चार कायम सदस्य देशांमध्ये हा करार झाला होता. त्यात इराणने आपण अणु बॉंब बनवणार नाही केवळ उर्जा निर्मीतीच्या कार्यासाठीच आपण अणुशक्तीचा वापर करू अशी हमी दिली होती. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा दूरगामी परिणाम होणार असून आखाती देशातील अर्थकारणावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button