breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘टीपी स्कीम’मध्ये नगरसेवकांच्या सूचनांचा अंतर्भाव, महासभेचा निर्णय

  • रखडलेल्या प्रस्तावाला महासभेची मिळाली मान्यता
  • समाविष्ट गावांतील विकासाला मिळणार चालणा

पिंपरी, (महाईन्यूज) – अहमदाबाद शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील समाविष्ट गावांसह काही ठिकाणी नगररचना  योजना  (टीपी स्कीम) राबविण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महापालिका सर्वसाधारण सभेत गुरुवारी (दि.6) या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र, काही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केल्याने सभेत नगरसेवकांच्या मर्जीने त्या-त्या भागात टीपी स्कीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियोजित रस्ते व आरक्षणे विकसित करून त्या भागांचा विकास या योजनेमुळे होणार आहे.

  • महापौर राहूल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. महापालिका नगररचना विभागाने या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी मे. एचसीपी कंन्सल्टंट या संस्थेची निवड केली होती. अहमदाबादच्या धर्तीवर ही टीपी स्कीम पिंपरी-चिंचवडमध्ये राबविली जाणार आहे. या अंतर्गत शहरातील थेरगाव, चिखली, चिंचवड, चर्‍होली, रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, डुडुळगाव, मोशी, बोर्‍हाडेवाडी या 12 भागांचा विकास केला जाणार आहे. त्यामध्ये प्रत्येक विभागात 39 हेक्टर ते 391 हेक्टर इतक्या क्षेत्रफळांचा विकास केला जाणार आहे. शहरातील 30, 50 व 70 टक्के विकास झालेल्या भागांचा प्रथम टप्प्यात निवड करण्यात आली आहे. सभेत या बारा भागांसह आयत्यावेळी थेरगाव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, रहाटणी, वाकडमधील काही भुखंडांचा समावेश करण्यात आला आहे.

टीपी स्कीम राबविण्यास व त्याचा अंतिम आराखडा तयार करून शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्याची कार्यवाही करण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. दरम्यान, काही नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित करत विश्वासात न घेता योजना राबविली जात असल्याचे म्हटले आहे. अखेर नगरसेवकांच्या मर्जीनुसार ही योजना राबविली जावी, असा निर्णय झाला.

  • शहर आणखी स्मार्ट होईल – संदीप वाघेरे 
  • टीपी स्कॅम राबविल्यामुळे शहर विकासाला हातभार लागणार आहे. शहरातील पवना, मुळा, इंद्रायणी काठच्या निळ्या व लाल पुररेषा असेलेल्या जागा उपयोगात येतील. ना विकासामधील जागा विकासामध्ये येईल. तसेच, एफएसआय, टीडीआरच्या माध्यमातून स्थानिक लोकांसाठी ही योजना फायदेशीर आहे. सेच, महापालिकेचाही यात फायदा होणार असून शहर आणखी स्मार्ट होण्यास मदत होईल. तर, त्याची अंमलबजावणी करताना कोणाचेही नुकसान होणार नाही. याची काळजी पालिकेने घ्यावी, असे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी म्हटले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button