breaking-newsपिंपरी / चिंचवड

टाळगाव चिखलीत ‘एक गाव एक शिवजयंती’ उत्सव

पिंपरी महाईन्यूज प्रतिनिधी

अखिल टाळगाव चिखली ग्रामस्थांच्या वतीने ‘एक गाव एक शिवजयंती’ उत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. गावातील सर्व ग्रामस्थ, सामाजिक मंडळे, संघटना एकत्र येऊन गेली सहा वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करीत आहेत.

मंगळवार दि.10 मार्च रोजी सायं.7 ते 9 “शिवचरित्राचे महत्व’ या विषयावर पराशर मोने यांचे व्याख्यान होणार आहे. तर रात्री 9 ते 11 या वेळात संतकृपा भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि.11 मार्च रोजी सकाळी 10 वा. रक्‍तदान शिबिर होणार आहे. तसेच यावेळी मोफत आरोग्य तपासणी होणार आहे.यामध्ये मोफत मधुमेह, नेत्र, डेंग्यू, मलेरिया, हिमोग्लोबिन, दंत चिकित्सा आणि लहान मुलांची आरोग्य तपासणी होणार आहे. तर याच दिवशी सायं. 6 ते 10 या वेळात महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम होणार आहे.

गुरूवार दि.12 मार्च रोजी सकाळी 9 वाजता शिवनेरी येथून आणलेल्या शिवज्योतीचे पूजन करुन शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येईल. तर सकाळी 10 वाजता भव्य दुचाकी फेरीचे आयोजन केले आहे. सायंकाळी पाच वाजता शिव मिरवणूक पवारवस्ती ते कुदळवाडी मार्गे चिखली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने होणार आहे.

मिरवणुकीत रायगडावरील 25 फुटी जगदीश्‍वराच्या मंदिराची प्रवेशद्वार प्रतिकृती , विविध ढोल पथक, मल्लखांब पथक, वारकरी पथक, राजस्थानी गेर नृत्य, ध्वजपथके तसेच अठरा पगड जातीतील विविध संतांचा रथ या पारंपरिक मिरवणुकीत सहभागी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button