breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

केरळमधील तीन वर्षांच्या मुलामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग

नवी दिल्ली – केरळमधील तीन वर्षांच्या मुलामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोरोना विषाणूची लागण झालेला हा भारतातील सर्वात कमी वयाचा रुग्ण आहे.

हे मुल 7 मार्च रोजी इटलीहून दुबईमार्गे भारतात आलं होतं. कोची विमानतळावर तपासणी करणाऱ्या पथकाला मुलाला हलका ताप असल्याचे आढळले.

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलाचे नमुने नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीत तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्ठी मिळाली आहे.” मुलाच्या वडिलाला रुग्णालयात स्वतंत्रपणे निरीक्षणाखाली ठेवले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

कर्नाटकच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “चीनमधून केरळला परतणा विद्यार्थ्यांव्यतिरिक्त, देशात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संशय असलेल्या रूग्णांचे सरासरी वय 40 ते 45 वर्षांच्या दरम्यान आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button