breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

अबब…बायकोचा असाही धाक, घरात झाली तब्बल 50 लाखांची चोरी सांगितली 5 लाख; हुशार चोरही 5 वर्षांनंतर…

पुणे: ‘पुणे तिथे काय उणे’ असं उगाच म्हटलं जात नाही. नवरा आणि बायकोमध्ये भांडणं होणे ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. घरात भांड्याला भांडे लागणारच ना. पण, बायकोला राग येऊ नये म्हणून प्रत्येक नवरोबा आपल्या परीने आटोकात प्रयत्न करतो. पुणेकर असलेल्या या नवरोबाने घरात तब्बल 50 लाखांची चोरी झाली फक्त बायकोला राग येऊ नये म्हणून पोलिसांना सांगितलेच नाही. पण म्हणता ना ‘कानून के हात लंब होते है’ त्यामुळे अखेर चोरांनीच कबुली दिल्यामुळे तब्बल 5 वर्षांनंतर हा प्रताप समोर आलेला आहे.

त्याचे झाले असे की, 5 वर्षांपूर्वी झालेल्या 50 लाखांच्या घरफोडीची नाट्यमयरित्या उकल डेक्कन पोलिसांनी केलेली आहे. पहिल्या चोरीत मोठे घबाड हाती लागण्याने दुसऱ्यांदा चोरी करण्यासाठी त्याच घरात शिरलेल्या चोरट्याला नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे. विशेष म्हणजे, या चोरट्यांनी चोरीच्या पैशातून दोघा चोरट्यांनी दोन सदनिका, चारचाकी गाडी आणि दागिने खरेदी केल्याचे समोर आले असून, हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. सोमनाथ बंडू बनसोडे(47,रा, वारजे माळवाडी) असे या चोरट्याचे नाव आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button