breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

टँकर सोसायटीत आणला म्हणून फ्लॅटधारकाकडून एकाला मराहाण

पिंपरी, (महाईन्यूज) – टँकर सोसायटीत आणला म्हणून सोसायटीची देखभाल करणा-या तरुणाला फ्लॅटधारकाने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 31) दुपारी चारच्या सुमारास कासारसाई येथे घडली.

सुभाष अशोक येवले (वय 27, रा. पाचाणेगाव, ता. मावळ) असे जखमी तरुणाचे नाव आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दिली आहे. शरद खेंगरे (रा. मारुंजी) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासारसाई येथील अचल डेव्हलपर्स कंपनीचे बांधकाम सुरू आहे. सोसायटीच्या कामकाजामुळे बाहेरील वाहनांना आत येण्यास बंदी घातली होती. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास शरद पाण्याचा टँकर सोसायटीत आला. सुभाष याने त्याच्याकडे विचारणा केली. शिवीगाळ करत बांधकामावरील लोखंडी फावड्याने मारहाण केली. तो गंभीर जखमी झाला आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button