breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडत उमरान मलिक ठरला सर्वात वेगवान गोलंदाज

उमरान मलिकने 155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी

मुंबई : भारतीय संघाचा युवा गोलंदाज उमरान मलिकला श्रीलंकेविरूद्ध पहिल्या टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. उमरान मलिक त्याच्या वेगासाठी ओळखला जातो. उमरानने या सामन्यात 155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून आश्चर्यचकित केलं आहे. या सोबत उमरान भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे.
उमरानने आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं होतं. म्हणुन त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली होती. त्याने या संधीचं सोनं केलं आहे. उमरानने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला आहे. उमरानने 155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकला बाद केले. त्याने 4 षटकात केवळ 27 धावा देत 2 बळी घेतले.
उमरानने मलिकने जसप्रीत बुमराहचा 153.36 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याचा विक्रम मोडला आहे. याशिवाय इरफान पठान 153.7, मोहम्मद शमीने 153.3 नवदीप सैनीने 152.85 आणि इशांत शर्मा 152.6 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली आहे. उमरानने आता या सर्वांचा विक्रम मोडला आहे.
यासोबतच, भारतीय संघात पदार्पनाच्या पहिल्या सामन्यात 24 वर्षीय शिवम मावीने विक्रम केला आहे. त्याने श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 सामन्यात चार बळी घेतले आहेत. शिवम मावीने चार षटकात 22 धावा देत 4 बळी घेत भारताला पहिला विजय मिळवुन दिला आहे. त्याच्या या कामगिरीचे सध्या मोठ्या प्रमाणात कैतुक होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button