breaking-newsताज्या घडामोडीपुणे

झोपडपट्टी धारकांना सर्व सुविधायुक्त हक्काची घरे मिळवून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे |महाईन्यूज|

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील झोपडपट्टी धारकांना सर्व सुविधांयुक्त हक्काची घरे मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड क्षेत्राच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, सचिव सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी झोपडपट्टी धारकांच्या गृहनिर्माण संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले.

बांधकाम व्यावसायिकांनी सामाजिक बांधिलकी जोपासून झोपडपट्टी धारकांना कमी कालावधीत चांगल्या दर्जाची घरे बांधून द्यायला हवीत, असे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, झोपडपट्टी धारकांना वर्षभरात अधिकाधिक घरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्टया प्रसिध्द असणाऱ्या पुण्यातील नागरिकांच्या हिताचे निर्णय शासन गतीने घेणार आहे. मेट्रो, रिंगरोड, विमानतळ विस्तारीकरण अशा मोठ्या प्रकल्पांची कामे निधी अभावी रखडू नयेत, यासाठी वेळेत निधी उपलब्ध करुन दिला जाईल. प्राधिकरणाचे हे कार्यालय सुसज्ज झाले असून या जागेतून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोपडपट्टी धारकांना चांगल्या सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात. या कार्यालयाचे कामकाज शासकीय जागेत सुरु होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगून शासनाची सर्व कार्यालये शासकीय जागेतच सुरु होण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button