breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोविड रुग्णांसाठी ‘प्लाझ्मा’ डोनेट करुन उर्जा फाऊंडेशन देतेय ‘जीवदान’

पिंपरी |महाईन्यूज|

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गामुळे थैमान घातले आहे. सद्यस्थितीत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. कोविड रुग्णालयात ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटर आणि आयसीयू बेडची व्यवस्था अपुरी पडत आहे. प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना ‘प्लाझ्मा’ अधिक आवश्यकता भासत आहे. त्यामुळे ऊर्जा फाउंडेशन संस्थेकडून समाजात जनजागृती करण्यात येत असून आतापर्यंत 56 रुग्णांना प्लाझ्मा डोनेट करीत जीवदान दिले आहे.

मार्च २०२१ पासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. या परिस्थितीत गंभीर स्थितीतील रुग्णाची संख्या वाढली आहे. त्यामुळेच प्लाझ्मा डोनेट ही अत्यावश्यक व जीवनदायी बाब बनली आहे. अशा कठीण परस्थितीत ऊर्जा फाउंडेशनची टिम ‘प्लाझा’ डोनरशी दिवसरात्र संपर्क करुन मागणी व उपलब्धेनुसार गंभीर पेशंटला प्लाझ्मा पुरविला जात आहे.

या कामात ऊर्जा फाउंडेशनच्या अध्यक्षा संस्कृती राम सातपुते, सचिव राहुल चंदेल ,किरण खोजे, सर्व टीमकडून प्रयत्न केले जात आहेत. अनेक कोविड रुग्णांना जीवनदान मिळाल्यांने पेशंटचे नातेवाईकांकडून ऊर्जा फाउंडेशनच्या टिमचे मनापासून ऋण व्यक्त करीत आहे. हा अनुभव अतिशय निश्चित प्रेरणादायी ठरत आहे. असे राहूल चंदेल यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button