breaking-newsपिंपरी / चिंचवड

खासगी सल्लागारांवर होणारी करोडो रुपयांची उधळपट्टी थांबवा

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

खाजगी सल्लागारावर होणारी करोडो रुपयांची उधळपट्टी तात्काळ थांबविण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड सरचिटणीस श्रीनिवास बिरादार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात बिरादार यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरातील रस्ते आरक्षणाची पाहणी खाजगी सर्वेक्षकांमार्फत करण्यात येणार आहे. या कामासाठी सल्लागारामार्फत तीन वर्षासाठी सर्वेक्षक सल्लागारामार्फत कामे केली जाणार आहेत. या कामासाठी एक कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे सल्लागारावरील करोडो रुपयांची उधळपट्टी तात्काळ थांबवावी. आपल्या अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवण्याऐवजी सल्लागार नियुक्त करून करोडो रुपये दिले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे.

या कामासाठी आपल्याकडे सक्षम अधिकारी असताना सल्लागारांची गरजच कशासाठी, असा सवाल बिरादार यांनी निवेदनात उपस्थित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button