breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत करोना पॉझिटिव्ह

मुंबई |

राज्यात करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकापासून ते आमदार, खासदारांसह मंत्र्यांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे देखील करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. माझी रॅपिड अॅन्टीजन टेस्ट सांगते की मी करोना पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की, त्यांनी तपासणी करून घ्यावी. मी प्रत्येकाला विनंती करतो की करोना नियमांचे पालन करा व सुरक्षित रहा. असं सचिन सावंत यांनी ट्विट केलं आहे.

वाचा- मोदींने केले निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन; TMC ची आयोगाकडे तक्रार

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button