breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ज्येष्ट नागरिक संघ महाराष्ट्रात आदर्शवत ठरावा; आमदार जगताप यांच्या हस्ते उद्घाटन

पिंपरी – आपला ज्येष्ट नागरीक संघ हा संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत ज्येष्ट नागरीक संघ व्हावा व शहराच्या विकासासाठी ज्येष्ट नागरीक संघ सतत कार्यरत रहावा, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्र.२६ विशालनगर, पिंपळे निलख येथील सावित्रीबाई फुले उद्यानाच्या शेजारील विरंगुळा केंद्राचे उद्घाटन त्यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ३०) झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, नगरसदस्या आरती चोंधे, नगरसदस्य संदीप कस्पटे, ज्येष्ट नागरीक संघाचे सुधाकर वेदपाठक, अरुण कस्पटे, सुर्यकांत मुथीयान, कार्यकारी अभियंता संजय कांबळे, बाबासाहेब गलबले आदी उपस्थित होते.

जगताप म्हणाले की, या शहरातील बांधण्यात आलेल्या विरंगुळा केंद्रासाठी महापालिकेच्या माध्यमातून यापुढेही जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. या विरंगुळा केंद्राचा लाभ प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. हे विरंगुळा केंद्र शहरातील महापालिकेच्या उद्यानातील पहिले विरंगुळा केंद्र असून ते उभारण्यासाठी नगरसदस्या आरती चोंधे यांनी गेल्या ५ वर्षापासून पाठपुरावा केला आहे. असेही ते म्हणाले.

यावेळी नगरसदस्य संदीप कस्पटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विरंगुळा केंद्रास २५ हजार मदत देत असल्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये नगरसदस्या आरती चोंधे म्हणाल्या, या केंद्रामध्ये ज्येष्ट नागरीकांचे विविध प्रकारचे कार्यक्रम पार पाडण्यास मदत होईल. यावेळी त्यांनी विरंगुळा केंद्रास २५ खुर्च्या व १ टेबल देण्यात येणार असल्याचे सांगितले.

सूत्रसंचालन व आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button