breaking-newsक्रिडा

रौप्यपदक विजेत्या सुधा सिंगला अखेर शासकीय नोकरी

लखनौ – आशियाई क्रीडास्पर्धेतील महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेज स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताची अव्वल धावपटू सुधा सिंगला उत्तर प्रदेश सरकारमार्फत राजपत्रित अधिकारी या पदावर नियुक्‍ती देण्यात आली. सुधा सिंगने या निर्णयाचे स्वागत करताना सांगितले की, उशिरा का होईना सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करते. तसेच हा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करते.

यावेळी पत्रकारांशी बोलताना सुधा म्हणाली की, मला सरकारच्या या निर्णयाचा ना आनंद आहे ना खेद. कारण मी 2014 मध्ये खेळाडूच्या कोट्यातून नोकरीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र माझ्या अर्जाकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. खरे तर मला शासकीय नोकरी खूप आधीच मिळायला हवी होती. मात्र त्यासाठी सरकारने खूपच विलंब केला आहे.

सुधाने पुढे सांगितले की, मी 2010 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले होते. त्याचबरोबर मी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्वही केले आहे. तसेच मला अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आलेले आहे. त्यामुळे शासकीय नियमानुसार मी क्रीडा विभागात उपसंचालकपद भूषवू शकते. परंतु मी केवळ क्रीडाविभागातच काम करू इच्छिते. इतर कोणत्याही विभागात काम करण्याची माझी इच्छा नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button