breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या कोविड-19 लसीच्या चाचण्यांना तात्पुरती स्थगिती

अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या फार्मासिटिकल डिव्हिजनच्या जेनसन-सिलेग कंपनीने कोविड-19 लसीच्या ब्राझीलमध्ये सुरु असणाऱ्या चाचण्यांना तात्पुरती स्थगिती दिली आहे..याबाबतची माहिती Brazilian Health Surveillance Agency ने दिली आहे.

Xinhua न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, VAC31518COV3001 या लसीच्या सुरक्षिततेची चाचणी सुरु होती. परंतु, लस दिलेल्या एका व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम दिसल्याने या लसीच्या चाचण्यांना स्थगिती देण्यात आल्याचे जेनसन-सिलेग कंपनीने Anvisa ला सांगितले आहे.

कंपनीने यासंदर्भात अधिक माहिती दिलेली नाही. तसंच लस दिलेल्या स्वयंसेवकाच्या प्रकृतीबद्दल देखील गुप्तता बाळगली आहे. या लसीमुळे झालेल्या प्रतिकूल परिणामांचा तपास होत नाही तोपर्यंत ट्रायल्सवरील निर्बंध कायम राहतील, अशी माहिती Anvisa ने दिली आहे. हा तपास विशेष सुरक्षा समितीकडून केला जाणार आहे..

ब्राझीलमध्ये पहिल्या स्वयंसेवकाला 9 ऑक्टोबर रोजी लस देण्यात आली होती. मात्र प्रतिकूल परिणामांमुळे चाचण्यांना मिळालेली स्थगिती Anvisa कडून मंजूरी मिळाल्यानंतरच करण्यात पुन्हा सुरु करण्यात येईल. लसीच्या पहिल्या डोसची सविस्तर तपासणी केली जाईल आणि मिळालेल्या डेटावरुन लसीच्या ट्रायल्स पुन्हा सुरु करण्याबाबत किंवा त्याला कायमस्वरुपी स्थगिती देण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती Xinhua न्यूज एजन्सीने दिली आहे. दरम्यान, जेनसन-सिलेग कंपनीला ब्राझीलमध्ये लसीच्या ट्रायल्स सुरु करण्यासाठी Anvisa कडून ऑगस्ट महिन्यात मंजूरी मिळाली होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना व्हायरसचे संकट जगभरात थैमान घालत आहे. यावर ठोस औषध किंवा लस उपलब्ध नसल्याने संसर्गाला आळा घालणे कठीण होत आहे. त्यामुळे लसीच्या विकासाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जगभरात कोविड-19 वरील अनेक लसीच्या चाचण्या सुरु आहेत. मात्र जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन लसीला मिळालेल्या स्थगितीमुळे काहीसे निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button